रात्रीला दिवसाची आठवण येते
दिवसाला मात्र रात्रीचा विसर पडतो,
तर मग दिवस, हे रात्रीला पडलेले
जणू स्वप्नच नव्हे काय?
दिवसाच्या उन्हापासून
झाडाखाली सावली मिळते.
रात्रीच्या चांदण्यापासून
वाचण्याची सोय नाही!
दिवसाचे असत्य पेलायचे असेल
तर रात्री अशाच,
जागून काढाव्या लागणार!
दिवसाला मात्र रात्रीचा विसर पडतो,
तर मग दिवस, हे रात्रीला पडलेले
जणू स्वप्नच नव्हे काय?
दिवसाच्या उन्हापासून
झाडाखाली सावली मिळते.
रात्रीच्या चांदण्यापासून
वाचण्याची सोय नाही!
दिवसाचे असत्य पेलायचे असेल
तर रात्री अशाच,
जागून काढाव्या लागणार!
No comments:
Post a Comment