फूल आलं फांदीतून .
फांदी आली कुठून ?
फांदी आली झाडातून
झाड आलं कुठून ?
झाड आलं मातीतून
म्हणजे काय झालं ?
फूल आलं मातीतून.. नाही का ?
छे … मुळीच नाही !
मग काय आकाशातून पडलं का ?
नाही !
फुल आलं आतून
तुझ्या आणि माझ्या
मनातून !
असं कसं काय विचारत बसू नका ,
पटलं तर घ्या … नाहीतर सोडून द्या !
No comments:
Post a Comment