Sunday, January 19, 2014

पण त्या दिवसाचं काय?
आपण  जिथे भेटलो त्या रस्त्याचं काय?

त्या रस्त्यावर उभ्या असलेल्या
आपलं बोलणं श्वास रोखून ऐकणाऱ्या
त्या झाडाचं काय?

झाडावरून खाली
वाऱ्यावर आपल्यासाठी अलगत तरंगत आलेल्या
त्या वाळलेल्या फुलाचं काय?

तुझ्या केसांबरोबरच माझ्या मनालाही घेऊन उडणाऱ्या
त्या वाऱ्याचं काय?

आणि आपली फुललेली मनं
प्रतिबिंबित करणाऱ्या
त्या निःशब्द नभाचं काय?

या सगळ्यांना मी कसं  सांगू
की तुला यातलं काहीच आठवत नाही…

1 comment:

  1. Photo sathi thankx na mhananarya tuzya sarkhya mitracha kay??

    ReplyDelete