रस्त्यात थांबून विचारतो
'का हो एवढी गर्दी?'
'भल्या मोठ्या हत्तीला
झाली म्हणे सर्दी!'
पण त्या गर्दीलाही दूर सारून
एक मुंगी मात्र आली वाट काढून
हत्ती झाला थक्क
कारण मुंगीने बघता बघता चक्क…
खिशातला हातरुमाल काढून दिला !
डोळ्यात पाणी आणून हत्ती म्हणाला
'केवढी काळजी बघ तिला!"
No comments:
Post a Comment