
काय ते नाही माहित,
पण मला दे कि थोडं
हा चंद्र नको.
हा तर नेहमीचाच ,
तुला दिसलेला दे.
हि फुले नको,
तुला ज्यांनी जिंकले
तीच शोधून दे.
हे अखंड पसरलेलं नको ,
चांदणं मला फक्त ,
तुझ्या डोळ्यात साठवलेलं दे.
तुझ्या डोळ्यांआड जे लपलं
ते हरवण्याआधी,
केसातून जे झिरपलं
ते झटकण्याआधी,
तुझ्या रुसण्यातून जे पुटपुटलं
तुझ्या हसण्यातून जे उसळलं
ते तुला पण समजण्याआधी,
तुझ्या श्वासातुन जे थरथरलं
ते स्थिरावण्याआधी,
तुझ्या मनात जे फुल्ल
ते शब्दात बांधण्याआधी,
मला दे की थोडं !
No comments:
Post a Comment