Wednesday, January 2, 2013

फरसाण

खिचडीवर, 
इडलीवर,
उपम्यावर,
पोहयांवर.
चवीसाठी जगणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर!

चहा बरोबर
दारू सोबत मित्राबरोबर
किंवा एकटंएकटंच गंमत म्हणून...
डब्यात सापडलं म्हणून!

चवीसाठी,
पोटासाठी,
जीभेसाठी,
तुझ्यासाठी, माझ्यासाठी!

थोडंतरी,
चिमुटभर,
मूठभर,
बकाणाभर !

मॅच बघताना,
कोडं सोडवताना,
विमान उडवताना!

उगाच नाही म्हणून...
कुरुम कुरुम कुरुम कुरुम!

पाकीट संपे पर्येंत!
(खाताना बोलू नये!)


1 comment: